बीड | वार्ताहर
बीड जिल्ह्यातून शुक्रवारी तपासणीला पाठवलेल्या 76 पैकी दोघांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर आता या रुग्णांच्या संपर्कातील लोकांसह जिल्ह्याच्या विविध ठिकाणाहून पुन्हा 76 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी अंबाजोगाईच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
यात जिल्हा सामान्य रुग्णालय बीड 21, कोव्हीड केअर सेंटर बीड 40, आष्टी ग्रामीण रुग्णालय 1, केज उपजिल्हा रुग्णालय 8, परळी उपजिल्हा रुग्णालय परळी 3, माजलगाव ग्रामीण रुग्णालय 1 आणि अंबाजोगाईच्या स्वाराती ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयातून 2 व्यक्तींच्या स्वॅबचा समावेश आहे अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकिशन पवार यांनी दिली.सायंकाळ पर्यंत हे सर्व रिपोर्ट प्राप्त होतील.
Leave a comment