बीड | वार्ताहर
कोरोनाच्या निश्चित निदानासाठी बीड जिल्ह्यातील 76 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांनी दिली.
जिल्हा सामान्य रुग्णालय बीड 21, बीड कोव्हीड केअर सेंटर 20, स्वाराती ग्रा. वै. महाविद्यालय अंबाजोगाई 3, ग्रामीण रुग्णालय,आष्टी 2 आणि केज उपजिल्हा रुग्णालयातून 30 असे एकूण 76 व्यक्तींचे स्वॅब तपासणीला पाठवण्यात आले आहेत.सायंकाळपर्यंत सर्व अहवाल प्राप्त होतील अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली
Leave a comment