नांदूरघाट । वार्ताहर

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी नांदूरघाट येथील पत्रकार मंच व राजे प्रतिष्ठान मार्फत आत्महत्याग्रस्त कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंची दोन ते तीन महिने पुरेल एवढी मदत केली. 

नांदूरघाट येथील संतोष क्षीरसागर या तरुणाने चौसाळा येथे गळफास घेऊन आत्महत्या केली. कुटुंबातील कर्ता व्यक्ती गेल्यानंतर संतोष शिरसागर यांच्या पत्नी व लहान लहान दोन मुले अडचणीत सापडले आहेत. या कुटुंबाला शेती नाही. संतोष क्षीरसागर यांचे बाजारामध्ये कापड दुकान होते. त्यावरच त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत होता. या कोविड-19 रोगामुळे दोन ते तीन महिन्यापासून कसल्याही प्रकारची आर्थिक प्राप्ती नसल्यामुळे नैराश्य पोटी तरुणाने आत्महत्या केली. त्यामुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. बजरंग सोनवणे यांनी नांदूरघाट येथे आत्महत्याग्रस्त कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंची यावेळी पत्रकार श्रीकांत जाधव, प्रल्हाद देशमुख, प्रदीप जाधव, मनोज देशमुख, बंडु जाधव, लहू कसबे, बालाजी हंगे, रामहरी कातळे आदी उपस्थित होते.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.