भरदिवसा प्री प्लॅन्ड चोरीच्या घटनेने खळबळ

अंबाजोगाई । वार्ताहर

अंबाजोगाईत वाहनातून रक्कम लंपास करण्याचा सिनेस्टाईल प्रकार समोर आला आहे. चोरट्याने स्वत: एका पिग्मी एजंटच्या कारच्या समोरील बोनटवर ऑईल टाकले.नंतर त्यानेच पिग्मी एजंटास तुमच्या कारमधून ऑईल गळती होत असल्याचे’ सांगीतले.कारचालक गळती कोठून होत आहे हे पाहत असतानाच चोरट्याने कारमधील 35 हजारांचा ऐवज हातोहात लंपास केला. 

श्रावण विश्‍वनाथ गारठे (23, रा.घाटनांदूर, ता.अंबाजोगाई) असे ऐवज चोरीला गेलेल्या चालकाचे नाव आहे. गारठे हे पिग्मी एजंट म्हणून काम करतात.मंगळवारी सायंकाळी चारच्या सुमारास ते व त्यांचा मामेभाऊ महेश हे दोघे कारमधून अंबाजोगाईतील मोंढा मार्केटमध्ये आले होते. या दरम्यान एका चोरट्याने श्रावण  गारठे यांच्या कारच्या बोनटवर स्वत:हून ऑईल ओतले. नंतर श्रावण यांना तुमच्या कारमधून ऑईल गळती होत असल्याचे’ सांगीतले. त्यानंतर श्रावण व महेश या दोघांनी कार थांबवत नेमकी ऑईल गळती कोठून होत आहे याची पाहणी सुरु केली.याच दरम्यान चोरट्याने कारमधील 25 हजारांची रक्कम, पिग्मी कलेक्शनची एक मशीन, खातेदारांनी दिलेले बँकेचे कागदपत्रे, क्रेडिट कार्ड, वाहन परवाना, आधार,पॅन कार्ड असा एकुण 35 हजारांचा ऐवज लंपास केला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर श्रावण गारठे यांनी शहर ठाण्यात तक्रार नोंदवली. सहाय्यक फौजदार बोडखे तपास करत आहेत. या सिनेस्टाईल घटनेची मोंढ्यात चर्चा होत होती.( प्रतिकात्मक फोटो )

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.