वनविभाग माणसाची शिकाराची वाट पाहतयं का?
आष्टी । वार्ताहर
गेल्या सहा महिन्यांपासून आष्टी तालुक्यातील शिरापूर परिसरात दररोज अनेकांना बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. याबाबत वेळोवेळी ग्रामस्थांनी वनविभागाला बिबट्या पकडण्याची मागणी केली असता केवळ वनविभागातील कर्मचारी गावांमध्ये येऊन जात आहेत. त्यामुळे वनविभाग माणसाची शिकार केली जाण्याची वाट पाहत आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गेल्या सहा महिन्यापासून आष्टी तालुक्यातील शिरापूर येथील उसाच्या फडात, मेहकरी रस्त्यावर बिबटयाला पाहत आहेत. सदरील बिबट्या कुत्रे, वासरे यांची शिकार केल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तसेच गत पंधरा दिवसांपूर्वी मेहकरी रस्त्याने जाणार्या दुचाकीच्या मागे पळत जाऊन शिकार करण्याच्या प्रयत्नात होता. या कठीण प्रसंगातून दुचाकीस्वाराने कशीबशी स्वतःची सुटका करून घेतली यानंतरही अनेकांना या बिबट्याने दर्शन दिले असून शिरपूर गावांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. शेतामध्ये ठरत आहे. त्यामुळे गावातील शेतकरी वर्ग शेतात जात आहे परंतु अनावधानाने त्याने मानवावर हल्ला केला तरी कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे. ग्रामस्थांनी आष्टी वनविभागात वारंवार बिबटया पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी केली आहे. परंतु अद्यापपर्यंत पिंजरा लावलेला नाही. त्यामुळे हा बिबट्या मानवाची शिकार करण्याची वाट वनविभाग पहात आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
नागरिकांमध्ये भीती
शिरापूरमध्ये गेल्या सहा महिन्यापासून बिबट्याचा मुक्त संचार सुरू असून नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. ग्रामपंचायत मार्फत वनविभागास अनेक वेळा बिबटया पकडण्याची निवेदने देऊन मागणी केली आहे. तरीही अद्याप बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आलेला नाही. त्यासाठी वन विभागाने तात्काळ या ठिकाणी पिंजरा लावावा अशी मागणी शिरापूरच्या सरपंच छाया बिभिषण कवडे यांनी केली आहे. ( प्रतिकात्मक फोटो )
Leave a comment