बीड । वार्ताहर
गेल्या काही वर्षांपासून पोस्ट आणि विश्वास हे समिकरण जनतेच्या मनात रूजलेले आहे. त्यामुळे पोस्टातील गुंतवणूकीच्या कुठल्याही योजनेमध्ये सर्वसामान्यांपासून तर श्रीमंतापर्यंत लोक सहभागी होतात. आर.डी.ची योजनाही आत्तातच रिकरींग डिपॉझिट ही सर्वसामान्यांची योजना म्हणून नावारूपाला आली आहे. ही योजना आजही सर्वसामान्य जनतेच्या हिताची ठरत आहे. गुंतवणुकदारांच्या मते ही योजना मार्केट लिंक्ड नसल्यामुळे खात्रीशीर रिटर्न देणारी ही योजना आहे. याठिकाणी आरडीमध्ये 5.8 टक्क्याने व्याज मिळते. पोस्ट ऑफिसमध्ये रिकरिंग डिपॉझिटचे खाते पाच वर्षांसाठी उघडण्यात येते.
हा पर्याय देखील एफडी प्रमाणेच एक चांगला आर्थिक पर्याय आहे. मात्र याठिकाणी गुंतवणुक अधिक फायद्याची आहे. एफडीमध्ये तुम्हाला एकरकमी गुंतवणूक करावी लागते. तर आरडीमध्ये तुम्हाला एसआयपी प्रमाणे वेगवेगळ्या इन्स्टॉलमेंटमध्ये महिन्याच्या महिन्याला गुंतवणूक करता येते. यामध्ये तुमच्या खात्यामध्ये व्याज तिमाही आधारावर कंपाउंडिंग होऊन जोडले जाते.
आरडीमध्ये व्याज कंपाउंडिंगच्या हिशोबाने जोडले जाते. याचा अर्थ असा की जेवढा जास्त टेन्योर असेल, त्याच हिशोबाने फायदा देखील वाढत जाईल. त्यामुळे आरडी करताना दीर्घकाळाचे लक्ष्य ठेवणे आवश्यक आहे. अनेक बँकांमध्ये मिळणारे व्याज कमी असून पोस्ट ऑफिसमध्ये आरडीवर मिळणारे व्याज 5.8 टक्के आहे.
या आरडी योजनेमध्ये तुम्ही महिन्याला कमीत कमी 100 रुपयांची गुंतवणूक करू शकता. यापेक्षा जास्त तुम्ही 10 च्या पटीमध्ये कितीही रुपयांची मासिक गुंतवणूक करता येईल. जास्तीत जास्त रक्कम जमा करण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही आहे.
Leave a comment