बीड । वार्ताहर
कोरोनाच्या निश्चित निदानासाठी आज गुरुवारी (दि.18) बीड जिल्ह्यातील 34 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांनी दिली. यात जिल्हा सामान्य रुग्णालयातून 24, बीड कोव्हीड केअर सेंटरमधून 6, अंबाजोगाईच्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयातून 1 आणि गेवराई उप जिल्हा रुग्णालय 3 व्यक्तींच्या स्वॅबचा समावेश आहे.
Leave a comment