बीड । वार्ताहर
बीड जिल्ह्यातून मंगळवारी तपासणीला पाठवलेले 87 व्यक्तींचे स्वॅब निगेटिव्ह आल्यानंतर आज बुधवारी (दि.17) सकाळी जिल्ह्यातून 57 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब अंबाजोगाई येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत जिल्हा आरोग्य विभागाकडून ही माहिती देण्यात आली.
यात जिल्हा सामान्य रुग्णालयातून 6, बीड कोव्हीड केअर सेंटरमधून 7,अंबाजोगाईच्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय व गेवराई उपजिल्हा रुग्णालयातून प्रत्येकी 2, आष्टी ग्रामीण रुग्णालय 5, केज उपजिल्हा रुग्णालय 28 आणि परळी उपजिल्हा रुग्णालयातून 7 व्यक्तींच्या थ्रोट स्वॅबचा समावेश आहे. सायंकाळपर्यंत अहवाल प्राप्त होतील अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांनी दिली.
Leave a comment