बीड । वार्ताहर

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सरकारने दुसर्‍या टप्यात पहिल्या वर्षात केलेली कामगिरी ऐतिहासीक, धाडसी आहे. बलशाही राष्ट्र निर्माण करतांना समाजातील शेवटच्या माणसाच कल्याण ही त्यांना दृष्टी असून राष्ट्रहितासाठी एका वर्षात घेतलेले निर्णय खुप महत्वाचे आहे. गरिबांचा पंतप्रधान ैी  त्यांची ओळख बनली असून कोरोना संकटाचा सक्षम मुकाबला त्यांनी केला म्हणुनच जनतेचे रक्षण होत असल्याचे प्रतिपादन खा.डा.ॅप्रितम मुंडे यांनी पत्रकार परिषदेत केले.

जिल्हा भाजपा कार्यालयात भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. विधान परिषद आ. सुरेश धस, राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी, भाजपा नेते रमेश आडसकर, रमेश पोकळे अभियान संयोजक चंद्रकात फड आदींची उपस्थीती होती, मोदी सरकारने एका वर्षात केलेल्या कामगिरीची माहिती देण्यासाठी आणि कोरोना संकट यासाठी पत्रकार परिषद बोलावली असल्याचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी सुरुवातीला  सांगीतले. मोदी सरकारची कामगिरी ऐतिहासीक जे प्रश्न वर्षानू वर्षा पासून खिचपत पडले ते एका वर्षात मोदीजीनी सोडवले असल्याचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी सांगीतले. आ. सुरेश धस यांनी शेतकरी,कष्टकरी,कामगार यांच्या हितासाठी घेतलेले निर्णय सांगून बीडच्या रेल्वेसाठी खासदारांच्या पुढाकाराने मोठा निधी मिळाला. केंद्र सरकारच्या योजना सर्व वर्गातील घटका पर्यन्त असल्याचे धस म्हणाले. 

या पत्रकार परिषदेत खासदार प्रितम मुंडेंनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे पत्रकाराशी संवाद साधला.कोरोना संकटाचा सामना देशात नरेंद्र मोदी यांच्या नेत्रत्वा खाली सरकारने प्रभावी पणे मुकाबला केला असून जागतीक आरोग्य पातळीवर कोरोना संकट थोपवण्यात चांगले यश येत आहे.वेळीच केलेले लॉक डावून आणि साधनाची उपलब्धता ज्यामुळे या संकटात मृत्यू दर कमी झाला इतर देशाचा तुलनेतप्रभावी उपाय करताना देशात 800 कोविड रुग्णालय ,300 प्रयोग शाळा निर्माण केल्या. पीपीई किट, मास्क आयात करावे लागत मात्र ही साधने देशात उत्पादन करुन भारताला आत्मनिर्भर बनवण्याचा संकल्प यशस्वी केला. या संकटाने अर्थव्यवस्था ढासळली. लगेच त्यांनी 1 लाख 70 हजार कोटीचे पॅकेज देवून सर्व घटकाला न्याय दिला. एका वर्षात धाडसी निर्णय घेतांना जम्मू काशिमीर मधील 370 कलम रद्द करणे.बाहेरच्या देशातील अल्पसंख्याक लोकांना नागरिकत्व देणे तिहेरी तलाख बंदी एवढेच नाही तर प्रभु राम चंद्राच मंदिर बांधण्या साठी ट्रस्ट स्थापना असे अनेक महत्वाची प्रभावी कामगीरी मोदी सरकारने एका वर्षात केली असल्याचे त्या म्हणाला.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.