धारुर । वार्ताहर
धारूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष डॉ. स्वरुपसिंह हजारी व मुख्याधिकारी नितीन बागुल यांनी
कोरोना रुग्ण सापडलेल्या दुधाळा भागात जाऊन पाहणी करतानाच कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाची चौकशी करण्यात आली. होम क्वॉरंटाईनमध्ये असणार्या व्यक्तींची विचारपूस करून त्यांना सुचना देण्यात आल्या.
मागील काही दिवसापूर्वी कोरोनावर मात करून धारूर येतील दुधिया विभागातील रुग्णाची सुटी झालेली आहे. नगराध्यक्ष व मुख्याधिकार्यांनी या रुग्णाच्या आरोग्याविषयी व त्यांच्या घरातील नागरिकांची चौकशी केली. प्रभाग 6 मध्ये रंगार गल्ली येथे पुणे येथून आलेल्या मुलीला होम क्वॉरंटाईनबाबत सुचना दिल्या. याप्रसंगी बाळासाहेब गायकवाड, संतोष सिरसट, शेख एजाज, प्रभाग समिती अध्यक्ष रुपेश चिद्रवार,शेख सिराज तसेच नगर परिषद कर्मचारी नितीन विजाते, अरुण वाघमारे, श्रीकांत वडगावकर,गोविंद मुंडे,सचिन डावकर, बालासाहेब शिनगारे उपस्थित होते.
Leave a comment