अंबाजोगाई । वार्ताहर
ब्राम्हण महासंघ शाखा,अंबाजोगाईतर्फे रविवारी (दि.14) पौराहित्य करणार्या समाजबांधवांनी करता आपापल्या घराजवळील मंदिराबाहेर किमान सोळा वेळा घंटा, शंखध्वनी ,झांज टाळ, इत्यादी वाद्यांचा उद्घोष करावा यासाठी महासंघाचे जिल्हाउपाध्यक्ष दुर्गादासजी दामोशन यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.
या बैठकीसाठी तालुकाध्यक्ष सौ. आरती सोनेसांगवीकर, तालुकाउपाध्यक्ष सौ.अंजली रेवलकर, सौ.अंजली कुलकर्णी,सौ.सारिका दिपक कुलकर्णी,शहराध्यक्ष सौ.शैलजा हरिभाऊ देशपांडे,शहरउपाध्यक्ष सौ.कल्पना संजय कुलकर्णी,सौ.अनिता सुरेंद्र देशपांडे ,सौ .सुचिता काटे ,चिटणीस सौ .सुवर्णा चितळे ,सरचिटणीस सौ. मोहिनी जोशी ,प्रसिद्धीप्रमुख कु. वैभवी कुलकर्णी तसेच शहरातील सर्व मान्यवर,प्रतिष्ठित नागरिक, विवेकवालेकर,सुशील सोनेसांगवीकर,मकरंद सोनेसांगवीकर,मिलिंद कुलकर्णी, प्रवीण रेवलकर इत्यादींची उपस्थिती होती. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून सामाजिक अंतर ठेवून ही बैठक घण्यात आली.
Leave a comment