धोंडराई । वार्ताहर
गेवराई तालुक्यातील तळणेवाडी,भोजगाव,कोमलवाडी येथे गेल्या पंधरा दिवसांपासुन वेगवेगळ्या नादुरुस्त कामामुळे तीनही गावातील पाणी पुरवठा बंद होता. या गावासाठी पिण्याच्या पाण्याची सोय म्हणुन अमृता नदीवर विहिरी असुन तेथुन पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा होतो या तिन्ही गावासाठी एकच रोहित्र संच आहे. या रोहित्रामध्ये वांरवार नेहमी काही ना काही बिघाड होत असतो त्यामुळे ग्रामस्थांना विहिरीमध्ये भरपुर पाणी असुन सुदधा पाणी मिळत नाही असाच प्रकार मागील पंधरा दिवसांपासुन तळणेवाडीला तर सहा ते सात दिवसांपासुन भोजगाव कोमलवाडीचा पाणी पुरवठा बंद असल्याचे समोर आले होते.
तळणेवाडीचा पाणीपुरवठा बंद राहण्याचे कारण गावांर्तंगत पाईपलाईनवर बसवण्यात आलेला सुसवॉलचे कामे करण्यासाठी वेळ लागला ती कामे करून घेऊन ती चालू करण्यासाठी टाकीमध्ये पाणी नसल्याने काही दिवस बंद राहिला त्यात पुन्हा वीजपुरवठा करणार्या रोहित्रामध्ये बिघाड झाल्याने पुढे ढकला होता त्यामध्ये पाऊस पडल्याने काम करण्यासाठी अडचणी आल्या अखेर दोन दिवसांपासुन तळणेवाडी,भोजगाव कोमलवाडी या तिन्ही गावांचा पाणीपुरवठा सुरळीत झाल्याने ग्रामस्थांमधुन सरपंच शिवाजीराव शिंगाडे, विष्णु आडे यांचे कौतुक होत आहे या कामासाठी लाईनमन काशीद, संगणक ऑपरेटर शैलेश संत, ग्रामरोजगार सेवक दिंगाबर गायकवाड, तुकाराम धस ,सुदर्शन संत यांनी या कामासाठी अथक प्रयत्न केले.
Leave a comment