आष्टी । वार्ताहर

सध्या पेरणीचे दिवस सुरू असून आष्टी तालुक्यातील देवीनिमगाव येथील लक्ष्मण वाळके हे शेतात पेरणी करत असताना शेतामधील विद्युत रोहित्रला बैलाचा धक्का लागल्याने विजेचा शॉक बसून बैलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली.

आष्टी तालुक्यातील देवी निमगाव येथील लक्ष्मण वाळके हे रविवारी दुपारी शेतामध्ये पेरणी करत असताना त्यांच्या शेतामध्ये असणार्‍या रोहित्रा जवळून ते पेरणी करत असताना रोहित्राला बैलाचा स्पर्श होताच बैलाला विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला.एकीकडे तालुक्यातील बैलांची संख्या कमी होत असतानाच आता दुर्दैवी प्रकार या शेतकर्‍यांकडे घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.केवळ महावितरणच्या हलगर्जीपणामुळे व दुर्लक्षपणामुळे या विद्युत रोहित्र ची दुर्दशा झालेली आहे या विद्युत रोहित्र कडे महावितरणचे गेल्या अनेक दिवसांपासून दुर्लक्ष असून सदरील रोहित्र हा उघड्यावरती आहे . जवळपास पन्नास हजार रुपये किमतीचा बैल मृत्युमुखी पडल्या मुळे शेतकर्‍याचे मोठे नुकसान झाले आहे.त्या मृत बैलावर तिथेच शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले असून शेतकर्‍यास नुकसान भरपाई मिळण्याची मागणी होत आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.