‘आपली आई धोंडराई’ व्हॉटसअप ग्रुपचे मदतीचे आवाहन

धोंडराई । वार्ताहर

आयुष्यात आलेल्या संकटांशी दोन हात करण्याची शक्ती असेल तर नियतीसुद्धा तुमचं काही करु शकत नाही.असाच काहीसा प्रसंग धोंडराई येथील भुमीपुत्र तथा नाटककार संतोष गायकवाड यांच्या जीवनात आला आहे. संतोष गायकवाड हे धोंडराई (ता.गेवराई) येथील रहिवासी असुन त्यांचा जन्म हा अत्यंत गरीब कुटुंबातील परंतु गरीब असल्याचे विसरुन त्यांनी त्यांच्या मेहनतीच्या जोरावर नाटककार, लेखक असे क्षेत्र निवडले. त्यामध्ये त्यांनी नावही लौकिक करण्यास चांगली सुरुवात केली आहे.परंतु संतोष हे मागील काही दिवसांपासून मेंदुत रक्तस्त्राव झाल्याने औरंगाबाद येथील एका खासगी रुग्णालयात आजाराशी झुंज देत आहेत.त्यांची घरची परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने त्यांच्या कुटुंबीयांची त्यांच्यावर उपचार करण्यासाठीची आर्थीक परिस्थिती नाही. त्यांच्या उपचारासाठीचा खर्च उचलण्यासाठी धोंडराई येथील गावकरी ‘आपली आई धोंडराई’ या ग्रुपच्या माध्यमातून आर्थीक मदत जमा करत आणखी मदतीचे आवाहन या ग्रुपच्या माध्यमातून करत आहेत. 

महाराष्ट्राच्या नाटककार तथा लेखकाला पुन्हा लढण्यासाठी ची जिद्द मिळावी यासाठी विविध दानशुर लोकांनी , सामाजिक संस्थांनी व कार्यकर्त्यांनी मदतीसाठी पुढे यावे असीच मागणी आता होत आहे.संतोषला उपचारासाठी आर्थीक मदत करण्यासाठी खाली दिलेल्या संतोषचा भाऊ दिपक गायकवाड यांच्या खात्यावर मदत जमा करण्याचे आवाहन देखील केले आहे.तसेच औरंगाबाद येथील जे.जे प्लस हॉस्पीटलच्या डॉक्टरांनी देखील संतोषला मदत करणार असल्याचे सांगितले आहे. संतोषची व त्याच्या कुटुंबीयाची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे.त्याच्या शस्त्रक्रियेसाठी तात्काळ पैशांची गरज आहे.संतोषचा भाऊ दिपक गायकवाड यांच्या 9860689594 या गुगल पे नंबरवर आपण मदत करा किंवा दीपक गायकवाड यांच्या खालील डइख अलर्लेीपीं वर मदत द्यावी.सगळ्यांनी यथाशक्ती हातभार लावून थोडी आर्थिक मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Account No.  62230419121

IFSC Code - SBIN0020420

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.