वडवणी । वार्ताहर
‘आमच्या ओट्याच्या कडेने बैल का नेले?’ अशी कुरापत काढून एका शेतकर्यासह त्याच्या पत्नीला चौघांनी मारहाण करत दुखापत केली. 8 जूनला घडलेल्या या घटनेप्रकरणी रविवारी (दि.14) एका कुटूंबातील चौघांविरुध्द वडवणी ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
दिलीप सखाराम काळे (48, रा.पिंपरखेड) असे जखमी शेतकर्याचे नाव आहे. ते त्यांच्या बैलाला घेवून जात असताना त्यांना तुम्ही आमच्या ओट्याच्या कडेने बैल का नेता अशी कुरापत काढून काळे कुटूंबातील एका महिलेने शिवीगाळ करत चापटाने मारहाण केली तर महादेव लक्ष्मण काळे याने डोक्यासह डाव्या हाताच्या मनगट व करंगळीवर मारहाण केली यात दिलीप यांचे हाताचे बोट फ्रॅक्चर झाले.यावेळी शुभम महादेव काळे व अन्य एकाने काठीने दिलीप यांना मारहाण केली. हे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या दिलीप काळे यांच्या पत्नीलाही ढकलून देवून आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दिलीप काळे यांच्या वरील आशयाच्या तक्रारीवरुन चौघांविरुध्द गुन्हा दाखल झाला. पोह.गित्ते तपास करत आहेत.
Leave a comment