या २ गोष्टींकडे दुर्लक्ष करु नका
नवी दिल्ली :
आरोग्य मंत्रालयाकडून कोरोना लक्षणांमध्ये आणखी काही संभाव्य लक्षणांचा समावेश करण्यात आला आहे. वास घेण्याची, चव घेण्याची शक्ती अचानक नष्ट होणं या लक्षणांचा कोरोनाच्या नव्या लक्षणांमध्ये समावेश करण्यात आला आहे. तोंडाची चव जाणं, कोणत्याही प्रकारचा वास, गंध न येणं ही कोरोनाची नवी लक्षणं असल्याचं सांगण्यात आलं आहे.
एका विशेषज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, ही लक्षणं विशेषत: कोरोना संबंधित नाहीत. कारण फ्लू, ताप किंवा इन्फ्लूएन्झामुळेही (शीतज्वर) व्यक्तीची वास किंवा चव घेण्याची क्षमता बिघडते. परंतु ही कोरोनाची प्राथमिक लक्षणं असू शकतात. ही लक्षणं आढळल्यास त्यानुसार, त्वरीत उपचार करण्यासाठी मदत होऊ शकते.
कोरडा खोकला, ताप, श्वसनविषयक समस्या, अशी कोरोना व्हायरसची सुरुवातीची लक्षणं आहेत. त्याशिवाय सांधेदुखी, तीव्र डोकेदुखी, घसा सुजणं, घशाला सूज येणं, घसा खवखवणं, अतिसार, धाप लागणे, कफ, थकवा येणं ही देखील कोरोनाची लक्षण असू शकतात.
राज्य सरकारचा मोठा निर्णय; कोरोना टेस्ट अवघ्या २२०० रुपयांत
कोरोना व्हायरसच्या Coronavirus वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार खासगी लॅब्सना कोरोना चाचणीसाठी जास्तीत जास्त २२०० रुपयेच आकारता येतील. यापूर्वी कोरोनाच्या टेस्टसाठी साधारण ४४०० रुपये आकारले जात होते. खासगी लॅब्समध्ये यावर इतर कर लागून कोरोना टेस्टची किंमत बरीच जास्त होती. मात्र, आता सरकारने या टेस्टसाठी २२०० रुपयांपेक्षा जास्त पैसे आकारू नयेत, असा आदेश काढला आहे. एखाद्या व्यक्तीच्या घरातून रक्ताचे आणि स्वॅबचे नमुने गोळा केले जात असतील तर त्यासाठी २८०० रुपये आकारण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, राज्य सरकारने कोरोना टेस्टसाठी किंमत निश्चित करुन दिल्यामुळे आता खासगी लॅब्सकडून होणारी लूट थांबणार आहे. यामुळे सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच कोरोना चाचणीचे दर निश्चित करण्यासाठी एक समिती स्थापन केली होती. यानंतर खासगी लॅब आणि राज्य सरकार यांच्यात चर्चाही झाली होती. या बैठकीत खासगी लॅबनी कोरोना टेस्टची किंमत कमी करण्याची तयारी दर्शविली. सध्या राज्यात RT-PCR तपासणीची सुविधा असलेल्या ४४ सरकारी आणि ३६ खासगी प्रयोगशाळा कार्यरत आहेत. यापैकी सरकारी लॅब्समध्ये कोरोना टेस्ट मोफत केली जात आहे.
Leave a comment