नवी दिल्ली- 

कोविड-१९ ने मरण पावलेल्यांचे मृतदेह हाताळण्यात यंत्रणेला अपयश येत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं ताशेरे ओढले आहेत. विविध राज्यांमधे कोविड रुग्णांची आणि मृतदेहांची आबाळ होत असल्याबद्दल स्वतःहून दखल घेत न्यायालयाने केंद्रासह दिल्ली, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, आणि तमिळनाडू या राज्य सरकारांना नोटिसा बजावल्या आहेत.

मृतदेहांची स्थिती भयावह असून, केंद्र सरकारनं त्याविषयी जारी केलेल्या सूचनांचे पालन झाले की नाही, अशी विचारणा न्यायालयाने सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांकडे केली आहे. दिल्लीच्या रुग्णालयांमधे कोविडने मृत्यू पावलेल्यांचे मृतदेह एकावर एक ठेवल्याचे आढळले होते. तर अनेक ठिकाणी रुग्णांच्या शेजारीच मृतदेह ठेवण्यात आले होते. अनेक ठिकाणी मृतदेहांची हेळसांड होत असल्याची दखल घेऊन सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे यांनी न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठाकडे त्याची सुनावणी सोपवली आहे.

दरम्यान, महाराष्ट्र राज्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येने एक लाखांचा टप्पा पार केला आहे. काल, शुक्रवारी एकूण 3493 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यासह राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 1 हजार 141 वर पोहोचली आहे. काल राज्यात एकूण 127 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर सध्या 49 हजार 616 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

राज्यातील मुंबई, पुण्यासह आता सोलापूर आणि औरंगाबाद ही कोरोना व्हायरसची हॉटस्पॉट बनली आहेत. या शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून हा सर्वांच्याच चिंतेचा विषय झाला आहे. राज्य सरकारचे एकप्रकारे अपयशच आता या वाढत्या आकड्यांमधून दिसत आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.