23 राज्यांत हे सर्वेक्षण करण्यात आले
मुलांना स्मार्ट फोनच उपलब्ध नसल्याचे वास्तव…
नवी दिल्ली :
करोनाच्या साथीमुळे ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय म्हणून गांभीर्याने विचार सुरू आहे. मात्र 56 टक्के मुलांकडे स्मार्ट फोनच नसल्याचे भीषण वास्तव एका सर्वेक्षणातून पुढे आले आहे. 42 हजार 831 विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणानंतर ऑनलाईन शिक्षण हा पर्याय होऊ शकत नसल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
करोना साथीची स्थिती आणि उपलब्ध पर्याय या विषयांतर्गत हे सर्वेक्षण स्माईल फाउंडेशन या संस्थेने केले. त्या अभ्यासात 43.99 टक्के विद्यार्थ्यांना सेल फोन उपलब्ध आहे. तेवढ्याच मुलांन साधा उपलब्ध असल्याचे स्पष्ट झाले आहे. 12.02 टक्के विद्यार्थ्यांना साधा फोनही उपलब्ध नाही.
टीव्हीच्या पर्यायाचा विचार करताना 68.99 टक्के विद्यार्थ्यांकडे टिव्ही आहे. मात्र 31.01 टक्के विद्यार्थ्यांना टिव्हीही माहित नाही असे समोर आले आहे. त्यामुळे दूर शिक्षणासाठी स्मार्ट फोनचा वापर हा पर्याय होऊ शकत नसल्याचे या संस्थेचे म्हणणे आहे.
या सर्वेक्षणात पहिली ते पाचवीच्या 19 हजार 576 विद्यार्थ्यानी सर्वेक्षणात भाग घेतला. सहावी ते आठवीचे 12 हजार 277 विद्यार्थी होते. तर नववी आणि दहावीचे तीन हजार 216 विद्यार्थी होते.
दिल्ली जुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू. प. बंगाल, आंध्र प्रदेश, तेलंगणा, उत्तर प्रदेश, हरियाणा यांसह एकूण 23 राज्यांत हे सर्वेक्षण करण्यात आले.
Leave a comment