मुंबई । वार्ताहर
राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत माहिती मिळताच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सर्व मतभेद दूर ठेवून धनजंय मुंडे यांना फोन करुन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. सहा महिन्यांपूर्वी विधानसभा निवडणुकीत पंकजा आणि धनंजय या दोन्ही भाऊ-बहिणींमधील मतभेद बघायला मिळाले होते. मात्र, आता धनंजय मुंडे यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर बहिण पंकजा मुंडे यांनी फोन करत तब्येतीची विचारपूस केली. ’प्रकृतीची काळजी घ्या आणि लवकर बरे व्हा’, असं पंकजा फोनवर धनंजय मुंडे यांना म्हणाल्या.
Leave a comment