ठाणे: राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या खासगी बंगल्यावर एका अभियंत्याला झालेल्या कथित मारहाणप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाच कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. या पाचही जणांना कोर्टात हजर करण्यात आले असता त्यांची १३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता घरातील लाइट बंद करून ९ मिनिटे दिवे लावण्याचे आवाहन केले होते. मोदी यांनी हे आवाहन केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या या भूमिकेवर टीका केली होती. आव्हाड यांनी आपली भूमिका ट्विट करून प्रसिद्धही केली होती. त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर पीडित तरुणाने आव्हाड यांच्याबद्दल सोशल मीडियावर एक आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. दरम्यान, त्या रागातून आव्हाड यांच्या सुरक्षा रक्षकांनी आपणास आव्हाड यांच्या बंगल्यावर नेवून त्यांच्यासमोर अमानुष मारहाण केल्याचा आरोप या तरुणाने केला होता. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आली होती. त्याआधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून पाच जणांना अटक केली आहे.
Leave a comment