राज्याला हादरे सुरुच, आज 3493 नवे कोरोनाग्रस्त
राज्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढताना दिसत आहे. राज्यात मागील २४ तासांत कोरोनाचे ३ हजार ४९३ नवे रुग्ण आढळले असून एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख १ हजार १४१वर पोहोचला आहे. तर आज २४ तासांत १२७ रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांच्या आकडा ३ हजार ७१७ झाला आहे. तसेच २४ तासांत १ हजार ७१८ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत ४७ हजार ७१६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज राज्यात एकूण ४९ हजार ६१६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४७.३ टक्के एवढे आहे. तर मृत्यू दर ३.७ टक्के आहे. सध्या राज्यात ५ लाख ७९ हजार ५६९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात १ हजार ५५३ संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७५ हजार ६७ खाटा उपलब्ध असून सध्या २८ हजार २०० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
आज झालेल्या मृत्यूंपैकी मुंबईत ९०, ठाणे ११, कल्याण डोंबिवली ३, वसई विरार १, मीरा भाईंदर १, नाशिक २, धुणे १, पुणे १२, सांगली ३, औरंगाबाद २ आणि अमरावतीमध्ये १ जणाचा मृत्यू झाला आहे.
राज्यात ४७ हजार ७९३ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा साडे तीन हजारांहून अधिक
Leave a comment