धनंजय मुंडेंना कोरोना संपर्कात आलेल्या लोकांचा प्रशासनाकडून शोध
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उद्धव ठाकरेंच्या मंत्रीमंडळातील मंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे कोरोनाची लागण झालेले ठाकरे सरकारमधील ते तिसरे मंत्री ठरले आहेत. दरम्यान धनंजय मुंडे यांच्या संपर्कात आलेले राष्ट्रवादीचे नेते आणि सरकारमधले अनेक मंत्री हे क्वारंटाइन झाले आहेत. राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात धनंजय मुंडे हे उपस्थित होते. यानंतर अनेक अधिकारी आणि मंत्री हे स्वतःची कोरोना चाचणी करुण घेत आहेत.
महाराष्ट्रात कोरोनाने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. रुग्णांचा आकडा हा सातत्याने वाढत आहे ठाकरे सरकारमधील दोन मंत्र्यांना आधीच कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी उपचार घेत कोरोनावर मात केली आहे. आज सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
बहुसंख्य अधिकारी ,स्वाराती मधील डॉक्टर ,आमदार,पदाधिकारी होणार क्वारांटायन
राज्यातील कापूस खरेदीचा आढावा तसंच शेतकऱ्यांकडील शिल्लक कापूस खरेदीला गती देण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या
अध्यक्षतेखाली 10 जुन रोजी मंत्रालयात महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी मंत्री धनंजय मुंडे उपस्थित असल्याचे दिसत आहेत
बीड / वार्ताहर
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना कोरोना ची लागण झाल्यामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली आहेआता प्रशासन सतर्क झाले आहे मुंडे यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाचा शोध घेऊन त्यांना 28 दिवस कॉरटाईन करण्याची प्रक्रिया केली जाणार आहे संपर्कात आलेल्या या लोकांमध्ये अनेक लोकप्रतिनिधी नागरिक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले धनंजय मुंडे यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनी संबंधित आरोग्य विभागाची तातडीने संपर्क साधावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे
बीड जिल्ह्यातील जे आमदार धनंजय मुंडे यांना भेटले त्यांनादेखील आता 28 दिवस विलगीकरनात राहावे लागणार आहे त्यामुळे बीड जिल्ह्यात यात मोठी खळबळ उडाली आहे
गेल्या अनेक दिवसापासून पालकमंत्री धनंजय मुंडे परळी शहरातच आपल्या निवासस्थानी राहून काम करत होते परळी येथील बाधित असलेल्या रुग्णांचे नातेवाईक धनंजय मुंडे यांच्या संपर्कात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे धनंजय मुंडे यांना अचानकच कोरोनाची बाधा झाल्याचा रिपोर्ट आल्यानंतर त्यांना ही कोरोनाची बाधा किती दिवसापासून झाली याचा शोध आता आरोग्य विभागाकडून घेतला जात आहे धनंजय मुंडे आणि त्यांचे स्वीय सहाय्यक आणि वाहन चालक यांना कोरोना ची लागण झाल्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचीही आता चौकशी सुरू झाली आहे जर बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचा धनंजय मुंडे यांच्याशी संपर्क झाला असेल तर या सर्व लोकांना आता 28 दिवस विलगीकरनात ठेवावे लागणार आहे प्रशासकीय पातळीवर ही कारवाई आता होणे गरजेचे आहे अन्यथा मोठा धोका होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे काही दिवसापूर्वीच अंबाजोगाई येथे स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते कोविड सेंटरचे उद्घाटन करण्यात आले या उद्घाटन समारंभाला अनेक लोकप्रतिनिधी अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी देखील उपस्थित होते एक लोकप्रतिनिधी म्हणून पालकमंत्री मुंडे यांना ज्या ज्या लोकांनी भेटी दिल्या किंवा त्यांच्या स्वीय सहाय्यक यांना कागदपत्र अथवा काही कामानिमित्त भेटी दिल्या त्या लोकांचा देखील आता शोध घेतला जाणार आहे जे नागरिक त्यांच्या संपर्कात आले आहेत त्यांनी आरोग्य विभागाची तातडीने संपर्क साधून आपली आरोग्य तपासणी करून घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे असे न झाल्यास हा मोठा धोका पत्करावा लागणार आहे जे लोक प्रतिनिधी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या संपर्कात आले आहेत हे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आता विलगिकरण कक्षात राहण्याची वेळ येणार आहे ( संग्रहित फोटो )
Leave a comment