अहमदनगरच्या 530 व्या स्थापना दिनी अभिमानास्पद पेहरावाचे लॉचिंग

अहमदनगर । वार्ताहर

ऐतिहासिक अहमदनगर शहराची ओळख आपल्या पेहरावातून मिरवण्याची संधी कोहिनूर वस्त्रदालनाने उपलब्ध करून दिली आहे. अहमदनगर शराच्या 530 व्या स्थापना दिनाचा मुहूर्त साधून कोहिनूरने आपल्या प्रसिध्द कॉटन शर्टसच्या खिशावर चांदबिबी महालाची प्रतिकृती एम्बॉस केली आहे. विविध रंगसंगतीत, उन्हाळ्यातही थंडावा देणारे खास कोहिनूर टच असलेले कॉटन शर्टस परिधान करणे नगरकर म्हणून निश्चितच अभिमानास्पद ठरणारे आहेत. या खास कॉटन शर्टसचे लॉचिंग रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलूलकर यांच्या हस्ते झाले, यायेळी कोहिनूरचे संचालक प्रदीप गांधी, अश्‍विन गांधी उपस्थित होते.

जयंत येलूलकर म्हणाले की, जगभरात स्थापना दिन माहिती असलेल्या मोजक्याच शहरामध्ये अहमदनगर शहराचा समावेश आहे. पंचशतकोत्तरी इतिहास असलेले आपले शहर इतिहासाच्या पाऊलखुणा जपत नव्या युगात वाटचाल करीत आहे. कोहिनूर परिवार सुरुवातीपासून नगर शहरावर प्रेम करणारा आहे. प्रदीप गांधी यांनी नेहमीच व्यवसायापलिकडे जावून विकासाच्या दृष्टीने नगर शहराबाबत विचार केला आहे. जगातील अन्य ऐतिहासिक शहरांप्रमाणेच नगरचा ऐतिहासिक ठेवाही जगात पोहचून शहराचा पर्यटनदृष्ट्या विकास व्हावा, अशी त्यांची कायम भूमिका असते. आताही शहराचा 530 स्थापना दिन साजरा करताना त्यांनी प्रत्येक नगरकराला अभिमानास्पद वाटेल अशी कॉटन शर्टसची क्वॉलिटी रेंज उपलब्ध करून दिली आहे. खिशावर चांदबिबी महालाची प्रतिकृती असलेला शर्ट परिधान केल्यावर प्रत्येकाचे शहराप्रती असलेले प्रेमच व्यक्त होईल. प्रदीप गांधी म्हणाले की, जगभरात अनेक देशात आपण पर्यटन केले आहे, या पर्यटनावेळी अहमदनगर शहराच्या ऐतिहासिकतेची प्रकर्षाने जाणीव होती, शहर व परिसरातील एकेक ऐतिहासिक वास्तू हा जागतिक दर्जाचा ठेवा आहे, तो व्यवस्थित जतन करून सर्वासमोर आल्यास नगरला पर्यटनातून मोठा विकास साधता येईल. शहराचा स्थापना दिन साजरा करता येगे हे तमाम नगरकरांचे भाग्य आहे. यंदा हा स्थापना दिन साजरा करताना कोहिनूरने आपल्या प्ररसिध्द कॉटन शर्टच्या खिशावर चांदबिबी महालाची प्रतिकृती साकारली आहे. हा शर्ट परिधान करणे प्रत्येकाला निश्चितच आवडेल. सदर शर्टस 599 रुपयांच्या पुढील किंमतीत उपलब्ध आहे. कोहिनूरमध्ये प्रत्यक्ष येवून अथवा ऑनलाईन ऑर्डर नोंदवून घरपोहोचही शर्टची डिलिव्हरी मिळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कोहिनूरमध्ये सॅनिटायझेशन, स्वच्छतेची पुरेपुर काळजी घेण्यात येत आहे. स्वयंचलित सॅनिटायजर, थर्मल स्कॅनिंग, सोशल डिस्टन्सिंगचे तंतोतंत पालन करुन ग्राहकांना सेवा दिली जात आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.