बीड । वार्ताहर
कोरोना संकटामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांचा भूगोल विषयाची परीक्षा घेण्यात आलीच नव्हती. या संदर्भात दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. ईतर विषयात मिळालेल्या गुणांच्या सरासरीवर भूगोल विषयात त्या विद्यार्थ्यांना गुण देण्याचा निर्णय एस.एस.सी. बोर्डाने घेतला आहे. गेल्या महिनाभरापूर्वीच हा पर्याय बोर्डाने शासनाला सुचविलेले आहे या पर्यायामध्ये एकूण 600 गुणांपैकी मिळालेल्या गुणानुसार टक्केवारी काढुन निकाल लावण्यात यावा असेही सुचविण्यात आले आहे.
Leave a comment