खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी व्यक्त केली अपेक्षा
परळी । वार्ताहर
आरोग्य यंत्रणा अधिकाधिक सक्षम करून प्रत्येक कोरोना बाधित रुग्णांवर चांगले उपचार करून त्यांना कोरोनामुक्त करावे अशा सूचना खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी ट्वीटरवरून संबंधितांना केल्या आहेत. याचप्रमाणे सामान्य नागरीकांच्या मनातील कोरोनाबाबतची भिती दुर करून त्यांच्यामध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करावे असेही त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
कोरोनाचा आता बीड जिल्ह्यात प्रवेश झाल्याने आपल्याला काळजी वाटत असल्याचे डॉ. प्रितमताई यांनी म्हटले आहे. बीड जिल्हयात कोरोनाचा प्रादुर्भाव निर्माण झाल्याने शासकीय यंत्रणेची झोप उडालीच आहे, तसेच लोकप्रतिनिधींनाही काळजी वाटू लागली आहे. बीडच्या खा. डॉ. प्रितमताई मुंडे या जरी मुंबईत असल्या तरी त्यांचे सर्व लक्ष बीड जिल्ह्याकडे आहे. येथील प्रत्येक घडामोडींवर लक्ष असुन त्या सतत जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या संपर्कात असुन असुन प्रत्येक कोरोना योध्यांना त्या प्रोत्साहन देत असतात.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सामान्य नागरीकांमध्ये भिती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोग्य आणि संबंधित यंत्रणांनी अधिक काळजीने वागण्याची आवश्यकता आहे. सामान्य नागरीकांची भिती कमी करून विश्वासाचे वातावरण निर्माण करणे ही काळाची गरज आणि येणार्या पिढीसाठी असणारं आपल उत्तरदायित्व आहे.सरकार याची सकारात्मक दखल घेईल ही अपेक्षाही खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी यांनी व्यक्त केली आहे.
Leave a comment