तीर्थपुरीवार्ताहर
सोशल डिस्टन्संचे पालन न केलेल्या सात दुकानदारावर कारवाई तीर्थपुरी येथे लोकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत दुकानदारांना आपले दुकान शासनाने ठरवून दिलेल्या व कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या नियमाचे पालन करून व्यवहार करण्याच्या सूचना असताना.
 तीर्थपुरी येथील व्यापार पेठेमध्ये काही दुकानदारांनी सोशल डिस्टन्स तसेच सॅनी टायझरचा दुकानांमध्ये वापर न केल्याने सात दुकानदारावर कारवाई करण्यात आली. 
तीर्थपुरीचे पोलीस उपनिरीक्षक गजानन कौळासे यांच्या फिर्यादीवरून सुमित श्यामसुंदर अग्रवाल, उद्धव रमाजी गुळवे अशोक सखाराम राईन्द्रें संतोष मुक्ताराम बोबडे विष्णू पांडुरंग रोडे पांडुरंग राजाराम उढाण मयूर भिमराव मोरे या सात दुकानदारावर  आपल्या दुकानात मध्ये मास्क न वापरता सोशल डिस्टन्स नियमाचे पालन न करता दिसून आले. 
तसेच कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावचे  शासनाने लावलेल्या संचार बंदीचा आदेशाचे उल्लंघन केले म्हणून त्यांच्यावर कलम १८८  २६९ ,२७०, ३४ ब भादवि ५१ भारतीय प्रमाणित कायद्यांतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.