गेवराई । मधुकर तौर
येथे गत काही दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या धान्य घोटाळ्यातील फिर्यादीच आता पोलीस तपासादरम्यान अटक झाले आहेत. अशोक भंडारे असे या नायब तहसीलदारांचे नाव असून पोलीसांनी चौकशीअंती त्यांना ताब्यात घेतले आहे. महसूलचा जबाबदार अधिकारीच धान्य घोटाळ्यात आरोपी झाल्याने एकच खळबळ उडाली.
गेवराई येथे रेशनचा गहू,तांदूळ अन् साखर आणि मालवाहू ट्रक असा तब्बल 69 लाख रुपयांचा माल काळ्या बाजारात विक्रीसाठी गोदामात दडवून ठेवल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. या प्रकरणात अरुण मस्के यांच्यासह त्यांच्या भावाविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता,अरुण मस्के फरार असला तरी त्याच्या भावसह एका गोदामपाल वर अटकेची कारवाई करण्यात आली होती. प्रकरणाचा तपास करणार्या यंत्रणेने नायब तहसीलदार अशोक भंडारे यांची चौकशी केली होती. त्यांच्या चौकशी दरम्यान समाधानकारक उत्तर मिळाली नाहीत म्हणून अखेर शुक्रवारी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (सविस्तर बातमी लवकरच)
Leave a comment