उपळी । शेख एजाज
सर्व देशभर कोरोनाने थैमान माजवले असताना ही महामारी बीड जिल्यात अली असून वडवणीमध्ये एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे उपळी येथील ग्रामपंचायत ने योग्य निर्णय घेऊन गावात बाहेरून आलेल्या लोकांचा पूर्णतः प्रवेश बंद कारण्यात आला. गावात बाहेरून आलेल्या लोकांना बाहेरच थांबवण्यासाठी ग्रामसेवक कुलकर्णी, सरपंच सुनंदा सौंदरमल,उपसरपंच शिवप्रसाद इंदाणी, पोलीस पाटील श्रीपत सावंत, प्रदीप शेळके, शेख नावाज व सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावकर्यांनी मिळून 10 लोकांचे ग्रुप बनवून नाका बंदी करून गावातील लोकांना या महामारीपासून वाचवण्यासाठी अतिशय उत्तम निर्णय घेतला आहे. यामध्ये गावकर्यांना दक्ष राहून सहकार्य करावे असे सरपंच सुनंदा सौंदरमल यांनी सांगितले आहे.
Leave a comment