बीड । वार्ताहर
जिल्ह्यातून मंगळवारी (दि.19) एकूण 67 जणांचे थ्रोट स्वॅब नमुने तपासणीसाठी लातूरच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले रात्री 10 वाजेपर्यंत या स्वॅबचे अहवाल लातूर प्रयोगशाळेतून जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले नव्हते. मध्यरात्रीपर्यंत अहवाल प्राप्त होतील अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
मंगळवारी सकाळी बीड जिल्हा सामान्य रुग्णालयातून सर्वाधिक 36, परळी-18 अंबाजोगाई येथून 2, केज उपजिल्हा रुग्णालयातून 8 व गेवराई उपजिल्हा रुग्णालयामधून 3 असे एकूण 67 जणांचे स्वॅब तपासणीला पाठवले आहेत. दरम्यान सोमवारी माजलगावात तालुक्यातील कवडगाव थडी येथे दोन रुग्ण आढळून आले होते. ते मुंबईहून आलेल्या बसमधील इतर प्रवाशांचा आरोग्य विभागाकडून शोध घेण्यात येत असून त्यांचेही स्वॅब तपासणीला पाठवण्यात येणार आहेत. दरम्यान सध्या बीड जिल्ह्यात एकूण 5 रुग्णांची अधिकृत नोंद असून यात पिंपळा, इटकूर, हिवरा येथील प्रत्येकी 1 तर कवडगाव थडी येथील 2 जणाचा समावेश आहे.
Leave a comment