राज्यात काय सुरु आणि काय बंद राहणार?

 

मुंबई  । वार्ताहर

कोरोनान व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेला लॉकडाऊन चौथ्या टप्प्यात पोहोचला आहे. संपूर्ण देशभरात आणि राज्यातही लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु झाला आहे. ज्याविषयीची सविस्तर नियमावली महाराष्ट्र शासनातर्फे जाहीर करण्यात आली आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत या नियमावलीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं.

 

सर्वाधिक महत्त्वाचा बदल म्हणजे पूर्वीचे झोन म्हणजे ग्रीन, ऑरेंज आणि रेड झोन रद्द करुन यापुढे रेड झोन, नॉन रेड झोन आणि कंटेन्मेंट झोन अशा स्वरुपात ही विभागणी केलेली असेल. ज्या धर्तीवर संबंधित परिसरामध्ये लॉकडाऊनच्या नियमांची आखणी करण्यात आलेली आहे. कंटेन्मेंट झोनमध्ये मोठ्या प्रमाणावर नियम अधिक कठोर असतील. जेथे अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणत्याही प्रकारची शिथिलता देण्यात आलेली नाही. तर, रेड आणि ऩॉन रेड झोनमध्ये त्याचं स्वरुप काहीसं बदलेलं आहे.  

 

 

लॉकडाऊन ४ मध्ये रात्रीची संचारबंदी 

-संध्याकाळी ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत सर्व सेवा बंद राहणार आहेत. 

-अत्यावश्यक सेवा वगळता संध्याकाळी ७ ते सकाळी ७ पर्यंत बाहेर पडायला मज्जाव असेल. 

-६५ वर्षांवरील वृद्ध, गरोदर महिला, इतर आजार असलेल्या व्यक्ती, १० वर्षांखालील मुलं यांनी घरीच थांबावं, वैद्यकीय कारणासाठीच त्यांना घराबाहेर पडण्याची मुभा. 

 

रेड झोन आणि बिगर रेड झोन विभागणी

- रेड झोनमध्ये मुंबई आणि एमएमआरमधील सर्व महापालिका, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती या महापालिका. 

- उरलेली सर्व क्षेत्र बिगर किंवा नॉन रेड झोन क्षेत्र म्हणून घोषित. 

 

- कंटेंन्मेंमट झोनमध्ये लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी केली जाणार असून, येथे अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद होणार

रेड झोनमध्ये काय सुरू राहणार

- अत्यावश्यक सेवेची सर्व दुकानं

- इतर दुकानांना परवानगी, त्याबाबत स्थानिक प्रशासन निर्णय घेणार

- स्थानिक प्रशासनाने परवानगी दिली तर दारूची दुकानं सुरू करता येणार, दारूची होम डिलिव्हरी करता येणार 

- टॅक्सी, रिक्षा सेवा बंद राहणार

- दुचाकीवर एकालाच परवानगी 

- मॉल्स, परवानगी नसलेली दुकाने, परवानगी नसलेली इतर आस्थापनं साफसफाईसाठी सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळात सुरू ठेवू शकतात

- दस्त नोंदणी कार्यालय, आरटीओ कार्यालय सुरू करण्याची परवानगी

- विद्यापीठ, महाविद्यालयात उत्तरपत्रिका तपासणी, निकाल लावण्यासाठी ५ टक्के कर्मचारी उपस्थित ठेवण्यास परवानगी

नॉन रेड झोनमधील नियम 

- स्पोर्टस् कॉम्प्लेक्स, स्टेडियम, खुल्या जागा वैयक्तिक व्यायामासाठी सुरू राहणार, पण सामुहिक जमावाला बंदी

- जिल्हांतर्गत बससेवा ५० टक्के प्रवासी क्षमतेने चालविण्यास परवानगी

- सलून सुरु ठेवण्यास परवानगी 

- सर्व दुकानं आणि बाजारपेठा सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत सुरू राहणार, मात्र गर्दी झाल्यास हे बंद करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासन घेऊ शकते.

सविस्तर माहितीसाठी वरील तक्ता पाहा... 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.