बीड । वार्ताहर
माजलगाव तालुक्यातील कवडगाव थडी येथे सोमवारी (दि.18) कोरोनाचे दोन बाधीत रुग्ण सापडल्यानंतर कवडगाव थडी या गावापासून 3 कि.मी. परिसरातील शेलगावथडी, रिधोरी, भगवाननगर, रामनगर, गव्हाणथडी व सुर्डी हा परिसर कंटेटमेट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.
तर पुढील 4 कि.मी. परिसरातील माजलगाव तालुक्यातील वारोळा, टाकरवण, राजेगाव व गेवराई तालुक्यातील तपेनिमगाव या गावात कोरोनाचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून बफर झोन जाहीर करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी याबाबत सोमवारी रात्री आदेश जारी केले आहेत. ही गावे पुढील अनिश्चित कालावधीसाठी पूणवेळ बंद करण्यात येवून संचारबंदी लागू करण्यात येत आहे असे जिल्हाधिकारी यांनी आदेशात म्हटले आहे.
Leave a comment