आतापर्यंत ३४ बळी ;कोरोनाग्रस्त रुग्णांची एकूण संख्या 1 हजार 21 वर
औरंगाबाद । वार्ताहर
औरंगाबादेत दिवसभरात कोरोना व्हायरसने 2 जणांचा बळी घेतला आहे. मृतांमध्ये पैठण गेट येथील 56 वर्षीय महिला आणि बुडीलेन येथील 42 वर्षीय कोरोनाबाधित पुरूषाचा समावेश आहे. त्यामुळं औरंगाबादेतील कोरोनामुळं मृत्यूमुखी पडणाऱ्या रुग्णांचा आकडा 34 वर गेला आहे. दरम्यान आज दिवसभरात औरंगाबादेत 59 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आलीय त्यामुळं जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची एकूण संख्या 1 हजार 21 वर गेली आहे. आतापर्यंत 280 रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानं त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या शहरात 20 मे पर्यंत पुर्णपणे लॉकडाऊन करण्यात आलं असून नागरिकांनी घराबाहेर पडू नये अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
Leave a comment