नवी दिल्ली -
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) वतीने घेतल्या जाणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीसाठीच्या उर्वरित विषयांच्या परीक्षा जुलैमध्ये होणार आहेत. त्या परीक्षा 1 ते 15 जुलै या कालावधीत घेतली जाणार असल्याची माहिती आज केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल-निशंक यांनी दिली.
करोना फैलाव रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्यामुळे सीबीएसईबरोबरच इतर परीक्षाही रखडल्या. आता निशंक यांनी केलेल्या घोषणेमुळे सीबीएसईच्या परीक्षांबाबतचा संभ्रम दूर होणार आहे. यानुसार, आज दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
Leave a comment