खुलताबाद । वार्ताहर
खुलताबाद तालुक्यातील तिसगाव तांडा येथील शेतकरी रोहिदास नेमा राठोड यांनी खुलताबाद पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गट नं 39 निरगुडी शिवारातील शेतजमीन असुन माझा भाऊ सखाराम नेमा राठोड यांस सांगितले कि आपण वाटुन घेतलेल्या शेतजमीन मला कमी आली असून मला तुझ्या ताब्यात काही शेतजमीन आली असुन तु मला परत दे असे सांगितल्यावर पुतण्या रामप्रसाद सखाराम राठोड, गोरख सखाराम राठोड, नातु विकास रामप्रसाद राठोड, आकाश रामप्रसाद राठोड यांनी शुक्रवारी माझा शेतात येऊन धमकावले, लाथाबुक्याने मारहाण करून शिव्यागाळ केली व जिवे मारण्याची धमकी दिली.
याबाबत खुलताबाद पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून खुलताबाद पोलिस ठाण्यात भांदवी 323,504,506,34 या प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सिताराम मेहेत्रे याच्या मार्गदर्शनाखाली नीलकंठ देवरे करीत आहे.
Leave a comment