औरंगाबाद । वार्ताहर
६० वर्षीय वृद्ध महिलेचा शुक्रवारी (दि. १५) दुपारी साडेतीन वाजता मृत्यु झाला. त्या महिलेचा मृत्युनंतर घेण्यात आलेल्या स्वॅबचा अहवाल शनिवारी पॉझीटीव्ह आला. हा आतापर्यंतचा २६ वा मृत्यू आणि एकूण बाधितांची सख्या ९०० असल्याचे माध्यम समन्वयक डॉ. अरविंद गायकवाड यांनी सांगितले.
रेल्वेस्टेशन परिसरातील राहुल नगर येथील ६० वर्षीय महिलेला २.४० मिनीटांनी घाटीत भरती करण्यात आले होते. त्यांचा साडेतीन वाजता उपचारादरम्यान मृत्यु झाला. त्यांच्या स्वॅबचा अहवाल शनिवारी पाॅझीटीव्ह आला आहे. मधुमेहासोबत कोरोनामुळे दोन्ही बाजुने झालेल्या न्युमोनीयामुळे त्यांचा मृत्यु झाला आहे. असे डॉ. गायकवाड यांनी सांगितले.
Leave a comment