गेवराई । वार्ताहर
कर्ज बाजारीपणाला कंटाळून एका शेतकर्याने लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरूवारी (दि.14) रात्री 11 वाजेच्या सुमारास तालुक्यातील मुधापूरी येथे घडली.
बलभीम उत्तमराव गिरे (40, रा.मुधापूरी) असे मयत शेतकर्याचे नाव आहे. गुरुवारी रात्री घरातील सर्व जण झोपल्यानंतर त्यांनी स्वत:च्या शेतात जाऊन लिंबाच्या झाडाला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. गिरे हे उशिरापर्यंत घरी न आल्याने घरच्या मंडळीने त्यांचा सर्वत्र शोध घेतला. शेतात त्यांचा गळफास घेतलेला मृतदेह आढळून आली. नंतर नागरिकांनी ही माहिती पोलीसांना कळवली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन घटनेचा पंचनामा केला. बलभीम गिरे यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली असल्याची गावात चर्चा आहे.
Leave a comment