मुंबई । वार्ताहर
विधानपरिषदेच्या 9 रिक्त जागांची निवडणूक बिनविरोध झाली आहे. मुख्यमंत्री उमेदवार असलेली निवडणूक बिनविरोध करण्याचे महाराष्ट्राच्या राजकारणात संकेत आहेत. त्यानुसार सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने संख्याबळानुसार उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली.
शिवसेनेचे 2, राष्ट्रवादीचे 2 आणि काँग्रेसचा 1 तर भाजपचे 4 असे एकूण 9 उमेदवार बिनविरोध निवडले गेले. या सर्वांचा शपथविधी आता सोमवारी 18 मे रोजी होणार आहे.
सर्व नवनिर्वाचित आमदार 18 मे रोजी दुपारी 1 वाजता विधानपरिषद सभापतींच्या उपस्थितीत विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतील.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुद्धा विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतील. विधानपरिषद निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे सर्व 9 उमेदवारांचा शपथविधी सोमवारी विधानपरिषदेत सभापतींच्या उपस्थित पार पडणार आहे.
Leave a comment