सीआयडी कारवाईत समोर आले सत्य

पालघर -

पालघर मधील गडचिंचले या ठिकाणी झालेल्या साधूंच्या हत्याकांडात स्थानिक राजकीय पक्षांचे कार्यकर्ते सहभागी असल्याचे समोर आले आहे. सीआयडीकडून अटक करण्यात आलेल्यांमध्ये सीपीआय व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

साधूंच्या हत्येत सहभागी असलेल्यांचे व्हिडीओ समोर आले होते. त्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा कार्यकर्ता विष्णू भावर साधूंना मारताना दिसतो. विष्णू भावर याला सीआयडी ने ताब्यात घेतलं आहे. राजेश राव, विनोद राव व रामदास राव या तिघांनाही सीआयडीकडून अटक करण्यात आली. 

राजेश राव, विनोद राव आणि रामदास राव तिघेही माकपचे सक्रिय कार्यकर्ते असल्याचे समजते. दरम्यान जाणक्या बोरसा नावाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याचा साधूंना मारतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. जाणक्या बोरसा यालाही सीआयडीने ताब्यात घेतले आहे. सारा प्रकार गैरसमजातुन घडला व यात राजकीय सहभाग नाही, अस वारंवार सांगणाऱ्या सर्वांचे पितळ या अटकेच्या कारवाईमुळे उघडे पडले आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.