बीड । वार्ताहर
राज्यामध्ये कोरोना संसर्ग झाल्यानंतर सर्वच कामकाज बंद पडले होते. जूनपर्यंत महावितरण असेल, दुरसंचार निगम असेल, गृहकर्जाचे हप्ते असतील, वाहनकर्जाचे हप्ते असतील या सर्वांना स्थगिती देण्याची घोषणा राज्यसरकारने केली होती, मात्र ही घोषणा हवेत जिरली असून बँकांनी गृहकर्जाची वसूली सुरू केली आहे, आता महावितरणने देखील आता ग्रीन व ऑरेज झोनमधील वीजबिल वसूली सुरू केली आहे. राज्यातील ग्रीन व ऑरेंज झोन असलेल्या जिल्ह्यामध्ये महावितरणने विजबिल भरणा केंद्र सुरू केले आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी 23 मार्चपासून राज्यात लोकडाऊन लागू करण्यात आले होते. याचाच एक भाग म्हणून महावितरणने गर्दी टाळण्यासाठी, महावितरणचे वीज बिल भरणा केंद्रही तात्पुरते बंद केले होते. तसेच, वीज देयक स्वीकारताना शारीरिक अंतर राखणे, मास्क परिधान करणे, केंद्राबाहेर मार्किंग करणे, हॅन्ड वॉश करणे इत्यादी सुविधा कामगार, अधिकारी व कर्मचारी यांना पुरविणे बंधनकारक करण्यात आले आहे. मुंबई शहरासह राज्यातील ईतर जिल्ह्यातही महावितरणने ही प्रक्रिया सुरू केली आहे.
Leave a comment