भाजपच्या हेविवेट नेत्यांना पक्षाचा दणका विधान परिषदेवर संधी नाहीच

विधान परिषदेत आयारामाना संधी

मुंबई | वार्ताहर 

  भारतीय जनता पक्षाच्या वतीने माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर, नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके आणि नांदेडचे डॉ. अजित गोपछेडे विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे माजी मंत्री एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपने धक्का दिला आहे

विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी येथे 21 मे रोजी निवडणूक होत आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत  धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागलेल्या  भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांना  या निवडणुकीत  संधी देऊन पुन्हा त्यांचे राजकीय पुनर्वसन केले जाईल  असे चित्र गेल्या आठ दिवसात  निर्माण झाले होते; परंतु पक्षाच्या हेवीवेट नेत्यांना या निवडणुकीतून बाजूला ठेवले गेले आहे, त्यामुळे मासलीडर नेत्यांना मोठा धक्का मानला जात आहे.

भारतीय जनता पक्षाच्या वतीने माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर, नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके आणि नांदेडचे डॉ. अजित गोपछेडे विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे माजी मंत्री एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचे राजकीय पुनर्वसन लांबल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 

रणजितसिंह मोहिते-पाटील हे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र आहेत, तर गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांच्याविरोधात बारातमी मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली होती, प्रवीण दटके हे नागपूरचे माजी महापौर आणि विद्यमान नगरसेवक आहेत, त्यांचे वडील प्रभाकरराव दटके हे भाजपाचे नेते होते. अजित गोपछेडे हे तीन दशकांहून अधिक काळ भाजपाचे कार्यकर्ते आहेत. या चारही नेत्यांना भाजपाकडून संधी मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या नऊ जागांसाठी निवडणूक जाहीर केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विधिमंडळ सदस्य होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता २१ मे रोजी होणारी विधान परिषदेच्या ९ जागांसाठीची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी प्रयत्न केले जात होते.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.