वडवणी । वार्ताहर
सरकारने सगळीकडे करोना संदर्भात लॉकडाउन व जमावबंदीचे आदेश देऊन आपआपल्या तालुक्यातील प्रशासकिय अधिकार्यांना काटेकोरपणे अंमल बजावणी करून कायदयाचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश दिले आहेत. या धर्तिवर वडवणी तहसिलदार श्रीमती स्वामी, सहाय्यक निरीक्षक महेश टाक, नगर पंचायतचे मुख्याधिकारी प्रशांत पाटील यांनी आपत्कालीन अत्यावश्यक सेवेमध्ये मुख्यालयी चांगले काम करत आहेत.
कोरोना विषाणुचा नायनाट करण्यासाठी सरकारने लॉकडाउन घोषीत करून जनतेला घरातच राहाने बंधन कारक केले आहे . संचार बंदीचे उल्लंघन होऊ नये म्हणुन अधिकार्यांना व कर्मचारी यांना सक्तीचे आदेश दिले आहेत. वडवणी प्रशासन चांगल्या प्रकारे काम आहे. कोणीही नागरीक विनाकारण घराबाहेर फिरताना दिसुन येत नाही सकळी 7 : ते 9 :30पर्यंत संचारबंदी शिथील केली जाते याच वेळात काही तुरुळीक नागरीक आत्य आवश्यक खरेदीसाठी बाहेर पडतात. वडवणी महसुल प्रशासनाने तालुक्यामध्ये वितरित होणारा शासकिय अन्न धान्याचा पुरवठा वेळेवर पोहचवून तेथील गोरगरिबांची उपासमार होणार नाही याची स्वःता काळजी घेऊन देखभाल करत आहेत.यामध्ये महसुलचे सर्व तलाठी मंडळअधिकारी कर्मचारी, ग्रामसेवक, न.प.कार्यालयीन अधीक्षक आयूब पठाण व कर्मचारी उपनिरीक्षक गव्हाने उपनिरीक्षक परदेशी, पोलीस नाईक मनोज जोगदंड, माळी, शिंदे, आघाव संजय राठोड आशिफभाई, बारगजे, वाघमारे,डोंगरेसह आदि सेवा देत आहेत.
Leave a comment