धारूर । वार्ताहर
धारूर येथे जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून संचारबंदी काळात मास्क न लावता रस्त्यावर आलेल्या पाच जणांना पपडून पोलीसानी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहे.
धारुर शहरातील दुधाळा गल्ली येथे संचारबंदीचे उल्लंघन करून प्रार्थनास्थळ उघडे आहे का? हे पाहण्यासाठी मास्क न लावता आले होते. दरम्यान यावेळी पोलीसांनी त्या सर्वांना ताब्यात घेत त्यांच्यावर कलम 188, 169 भा.दं.वि. प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. शहरात ठिकठिकाणी पोलिस कर्मचारी तैनात असून कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी अशा प्रकारचे गुन्हे नोंद करत आहेत.पो.हे.कॉ. बास्टे हे करत आहेत
Leave a comment