लॉकडाऊनमुळे अडकलेल्या व्यक्तींच्या

परवानग्यांसाठी नियंत्रण कक्ष स्थापन 

बीड । वार्ताहर
बीड जिल्ह्यात राज्यांतर्गत, परराज्यातून समुहामध्ये येणार्‍या नागरिकांसाठी जिल्ह्यात येण्यास परवानगी बाबतची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली असून त्याबाबतचे आदेश रविवारी (दि.3) जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.
राज्यांतर्गत, परराज्यातून बीड जिल्ह्यात समूहाने येणार्‍या व्यक्तींची संबंधित नोडल अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त होणारी यादी, जोडपत्र ब (Annexure B) मधील परवानगी, वैद्यकीय प्रमाणपत्र, रूट प्लॅन, वाहनाची परवानगी, वाहनाचे प्रकार, प्रवासाचा कालावधी इत्यादी पत्रासह माहिती प्राप्त झाल्यानंतर जिल्हा नियंत्रण कक्षाने निवासी उपजिल्हाधिकारी यांचे संबंधितांना परवानगीचे पत्र पाठवावे व अशी प्राप्त यादी संबंधित तहसीलदार यांना पुढील कार्यवाहीसाठी पाठवावी.
वरील  परवानगीनंतर समूहाने येणारे व्यक्तींची चेकपोस्टवरती (ऊसतोड कामगारांसाठी विहीत केलेल्या कार्यपद्धती प्रमाणेच) वैद्यकीय तपासणीसह इतर कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात येईल. चेकपोस्टवरील वैद्यकीय पथकामार्फत आलेल्या प्रत्येक व्यक्तींची थर्मल गनद्वारे व इतर अनुषंगिक तपासणी करून आवश्यकतेनूसार होम कोरनटाईन किंवा Institutional Quarantine करण्याची कार्यवाही तालुका आरोग्य अधिकारी यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे सल्ल्याने करावी.ज्या व्यक्तींना होम कोरनटाईन करण्यात आले आहे अशा व्यक्तींची पुढील 28 दिवसासाठी शहरी भागात महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत हे पाहतील ग्रामिण भागात संबंधित ग्रामसेवक हे पाहतील. या व्यक्ती संबंधित गावी पोहोचल्यानंतर (ऊसतोड कामगार गांवी पोहोचल्यानंतर करावयाच्या कार्यपद्धती) दिनांक 18 एप्रिल 2020 रोजी प्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात येईल. या आदेशाची अवाज्ञा करणार्‍या कोणत्याही व्यक्तीने अथवा संस्थेने भारतीय दंडसंहिता 1860 (45) याच्या कलम 188 शिक्षेस पात्र अपराध केला असे मानण्यात येईल आणि दिवाणी व फोजदारी कार्यवाही करण्यात येईल.

लॉकडाऊनमुळे अडकलेल्या व्यक्तींच्या

परवानग्यांसाठी नियंत्रण कक्ष स्थापन 

कोरोना विषाणूचा  (covid-19)प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या लॉकडाऊनमुळे बीड जिल्ह्यात अडकलेल्या व्यक्तींना त्यांच्या मूळ ठिकाणी जाण्यासाठी, तसेच बीड जिल्ह्याबाहेर अडकलेल्या व्यक्तींना जिल्ह्यात प्रवेशाची परवानगी देण्यासाठी आयटीआय कॉलेज नगर रोड, बीड येथे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येत आहे. अशा अडकलेल्या व्यक्तींना परवानगी मिळवण्यासाठी https://covid19.mhpolice.in या लिंक वर भेट देऊन अर्ज करणे आवश्यक आहे. 

     यासाठी  श्रीकांत निळे, तहसीलदार (महसूल) यांची  सनियंत्रण अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात येत असून पोलीस उपनिरीक्षक लोंढे यांच्याशी समन्वय साधून नियंत्रण कक्षाचे प्रमुख म्हणून काम करतील.केंद्र  व राज्य शासनाच्या निर्देशानुसार लॉकडाऊन कालावधीमध्ये इतर राज्यातील,केंद्रशासित प्रदेशामधील विस्थापित कामगार, पर्यटक, भाविक, विद्यार्थी व इतर व्यक्ती असतील यांना त्यांच्या राज्यामध्ये जाण्यासाठी तसेच महाराष्ट्रातील इतर राज्यात, केंद्रशासित प्रदेशात अडकलेल्या विस्थापित व्यक्तींना प्रवेश देण्यासाठी मुभा देऊन त्यासाठी कार्यपद्धती शासनाने निश्चित केली आहे.या आदेशाची  अवाज्ञा  करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने अथवा संस्थेने भारतीय दंड संहिता 1860 (45) याच्या कलम 188 शिक्षेस पात्र असलेल्या अपराध केला असे मानण्यात येईल आणि दिवाणी व फौजदारी कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी बीड यांनी  आवाहन केले आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.