सिरसाळ्यात रोडरोमिओवर गुन्हा नोंद
सिरसाळा । वार्ताहर
शेतात ये-जा करत असताना अल्पवयीन मुलीचा फोटो काढून त्याचा टिक टॉक व्हिडीओ करुन बदनामी केल्याची घटना परळी तालुक्यातील हिवरा गावात गुरुवारी घडली.या प्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून सिरसाळा पोलीस स्टेशनमध्ये ऍट्रॉसिटी अॅक्ट, बाल लैंगिक अत्याचार कायदा व माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.
सतरा वर्षीय मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार,परळी तालुक्यातील हिवरा या तिच्या गावी ती शेतात जाताना किंवा येताना कधीतरी तिचा मोबाईलमध्ये फोटो काढून अश्लील शब्दरचना करून टिक टॉक च्या माध्यमांतून व्हिडीओ प्रसारित करत बदनामी केली.मुलीच्या तक्रारीवरून प्रदीप नारायण निर्मळ याच्याविरुद्ध सिरसाळा पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत डिसले करीत आहेत.
Leave a comment