बीड । वार्ताहर
येथील जिल्हा सामान्य रुग्णालय व अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षातून शुक्रवारी (दि.1) सकाळी तपासणीसाठी पाठवलेल्या प्रत्येकी 1 अशा एकुण 2 थ्रोट स्वॅबचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आला आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी ही माहिती दिली.
शुक्रवारी सकाळी दोघांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. रात्री हे रिपोर्ट जिल्हा रुग्णालय प्रशासनाला प्राप्त झाले. दोन्ही कोरोना निगेटिव्ह आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आत्तापर्यंत तपासलेले सर्व 207 थ्रोट स्वॅब नमुने कोरोना निगेटिव्ह ठरले आहेत. बीड जिल्ह्यात सध्या परजिल्ह्यातून आलले 20 जण होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत. तर 134 जण संस्थात्मक विलगीकरण कक्षात आहेत.शुक्रवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंत ऊसतोडीसाठी पश्चिम महाराष्ट्रात गेलेले एकुण 33 हजार 411 मजुर जिल्ह्यात परतले असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांनी सांगीतले.
Leave a comment