हिंगोली | वार्ताहर
कोरोनामुक्त झालेल्या हिंगोलीत कोरोनाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. कालपासून एका दिवसात हिंगोलीत तब्बल 26 नवे रुग्ण सापडले आहेत. विशेष म्हणजे यापैकी 25 जण हे राज्य राखीव पोलिस दलाचे जवान आहेत. त्यामुळे आता हिंगोलीकरांची चिंता चांगलीच वाढली आहे.
हिंगोलीतील कोरोनाबधितांची संख्या गेल्या 24 तासात 21 वरुन थेट 47 वर गेली आहे. यापैकी एका रुग्णाला डिस्चार्ज मिळाला असून 46 जणांवर उपचार सुरु आहेत. हिंगोलीवासियांचं कोरोनामुक्त झाल्याचं स्वप्न आधी एकदा भंंगल होतं, आता रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने उलट चिंता वाढत आहे.
विशेष म्हणजे यापैकी 25 जण हे राज्य राखीव पोलिस दलाचे जवान आहेत. अवघ्या दहा दिवसांपूर्वी हिंगोली जिल्हा 'कोरोना'मुक्त झाल्याची घोषणा झाली होती, मात्र इतक्या कमी दिवसात रुग्णसंख्या फोफावून पन्नाशीच्या उंबरठ्यावर आल्याने धाकधूक वाढली आहे.
हिंगोली जिल्ह्यातील पहिल्या कोरोना रुग्णाचा रिपोर्ट 16 एप्रिलला निगेटिव्ह आला होता. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 21 एप्रिलला दुपारी चार वाजता हिंगोली जिल्हा 'कोरोना'मुक्त झाल्याची घोषणा केली होती, मात्र त्याच दिवसात, अवघ्या साडेचार तासांमध्ये सहा नवे रुग्ण आढळले.
Leave a comment