मुंबई । वार्ताहर
राज्यपालांकडून उद्धव ठाकरेंच्या नावाची घोषणा होण्यास विलंब होत आहे. भाजपाकडून जाणुनबुजून उद्धव ठाकरेंना आमदार होऊ नये असं राजकारण खेळलं जात आहे असा आरोप करण्यात येत आहे. मात्र हे आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळत सांगितलं आहे की, आम्हाला मागच्या दारानं सत्ता स्थापन करण्यास रस नाही. उद्धव ठाकरेंच्या विधान परिषद नियुक्तीवरुन राज्यपाल घटनेनुसार आणि कायद्याच्या चौकटीत जे योग्य आहे त्यानुसार निर्णय घेतील असा विश्वास आहे असं ते म्हणाले. तसेच उद्धव ठाकरे आमदार झाले आणि मुख्यमंत्रिपदी कायम राहिले तर भाजपाला आनंदच आहे. राज्यात राजकीय अस्थिरता नको असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
Leave a comment