एकमुखी निर्णय घेत बीड विधानसभेत जगतापांना दिला पाठिंबा

 

बीड / प्रतिनिधी

 

 बीड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अनिलदादा जगताप यांना सर्व मराठा सेवक आणि सकल मराठा समाजाने एकमुखी पाठिंबा दिला. आता फक्त अनिलदादाच असा नारा देत जगताप यांना निवडून देण्याचा निर्धार केला आहे. यामुळे अवघ्या राज्याचे लक्ष लागलेल्या बीड मतदारसंघातील निवडणुकीचे समिकरण बदलणार असून अपक्ष उमेदवार अनिलदादा जगताप यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

बीड विधानसभा निवडणुकीत अनिल जगताप यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. मात्र जरांगे कुणाला पाठींबा देतात का याकडे लक्ष होते. आपण थेट कुणाला पाठींबा देणार नाही असे मनोज जरांगेंनी स्पष्ट केले असले तरी अप्रत्यक्षपणे जरांगेंची भूमीका काय असेल याकडेही लक्ष होतेच. बीड मतदारसंघात कोणाला पाठिंबा द्यायाचा या विषयी जरांगे पाटील यांनी मराठा समाजावर निर्णय सोपविला होता. दरम्यान गुरुवारी सर्व मराठा सेवक आणि सकल मराठा समाजाने एकमुखी निर्णय घेत अपक्ष उमेदवार अनिलदादा जगताप यांना पाठिंबा दिला. एवढेच नाही तर आता फक्त अनिलदादाच असा नारा देत त्यांना मोठा मताधिक्याने निवडून आणत विधानसभेत पाठिवण्याचा निर्धारही केला. यामुळे बीड मतदारसंघात अनिल दादा जगताप यांची ताकद दुपटीने वाढली आहे.    

 

  मराठा सेवक व सकल समाजबांधवांनी घेतला निर्णय 

 

ऍड मंगेश पोकळे,c a भानुदास जाधव,किशोर पिंगळे,गंगाधर काळकुटे, बळीआप्पा गवते,स्वप्नील भैय्या गलधर,डॉ.गणेश ढवळे,डॉ.बाळासाहेब पिंगळे,हनुमान मुळीक,जयदत्त थोटे, गोरख शिंदे,संजय गोडसे,लक्ष्मण नरनाळे,ऍड बापूराव जाधव,युवराज मस्के, अशोक सुरवसे,तुळशीदास महाराज शिंदे,समाधान कागदी,शेळके पाटील आदीजण याप्रसंगी उपस्थित होते

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.