कृषी मंत्री धनंजय मुंडेंच्या पिक विमा कंपनीस कडक सुचना
धनंजय मुंडेंकडून बीड जिल्ह्यातील नुकसानीचा आढावा
अतिवृष्टीमुळे बाधित संपूर्ण क्षेत्राच्या मदतीचे अहवाल तात्काळ सादर करा
बीड
मागील काही दिवसात झालेल्या सततच्या पावसाच्या पाण्यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून तातडीने त्याचे सॅम्पल सर्व्हे विमा कंपनी व कृषी विभागाने संयुक्तरित्या 8 दिवसात पूर्ण करुन त्यापुढील 15 दिवसात शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा अग्रीम पिक विमा मिळावा, असे निर्देश कृषी मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री धंनजय मुंडे यांनी आज बैठकीत दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज श्री मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. याबैठकीस आमदार बाळासाहेब आजबे, जिल्हाधिकारी अविनाश पाठक, मुख्य कार्यकारी अधिकारी संगीता देवी पाटील, ऍड.राजेश्वर चव्हाण , निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, जिल्हा कृषी अधिक्षक बाबासाहेब जेजुरकर, आत्माचे प्रक्लप संचालक सुभाष साळवे यांच्यासह विमा कंपनीचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पिक विमा कंपण्यांचे प्रतिनिधींना पुढील आठवडयाभरात कृषी विभागाच्या सहकार्याने नमुना सर्वेक्षण करून त्याच्या पुढील 15 दिवसात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पिक विमाचा लाभ मिळाण्याबाबत सुचना केल्या. नमुना सर्वेक्षण करताना कुठलेही चुक अथवा दुर्लक्ष विमा कंपण्यांकडून झाली असल्यास अशा कर्मचाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल केले करावेत असेही निर्देश पालक मंत्री यांनी यावेळी दिले.
बीड जिल्ह्यात अतिवृष्टी झालेल्या सर्व महसूल मंडळातील नुकसानीच्या भरपाईचे नैसर्गिक आपत्ती अनुदान मागणीचे अहवाल राज्य शासनास तात्काळ सादर करावेत, असेही निर्देश श्री. मुंडे यांनी जिल्हा प्रशासनास दिले आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणीचा घेतला आढावा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण यां योजनेचा आढावा पालक मंत्री श्री मुंडे यांनी घेतला असून जिल्हयातील एकूण 6 लाख 41 हजार 147 महिलांचे अर्ज प्राप्त झालेले आहेत. यापैकी 6 लाख 16 हजार 788 महिलांचे अर्ज मंजुर झालेले असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री. पाठक यांनी श्री. मुंडे यांना दिली. 12 हजार 611 अर्जांवर मंजुरी देण्याची प्रक्रिया सुरू असून 11 हजार 748 अर्ज विविध कारणांनी प्रलंबित असल्याचे जिल्हाधिकारी यांनी पालक मंत्री यांना सांगितले, उर्वरीत अर्जांवरील समस्या लवकर दूर करून त्यांनाही मंजुरी देण्याचे निर्देश पालक मंत्री श्री. मुंडे यांनी यावेळी केल्या.
Leave a comment