बीड । वार्ताहर

कोलकाता येथे 9 ऑगस्ट 2024 रोजी आरजी कार मेडिकल कॉलेज, एका तरुण पोस्ट-ग्रॅज्युएट चेस्ट मेडिसिनच्या विद्यार्थीनीची ड्युटीवर असताना बलात्कार करुन हत्या करण्यात आली. या संतापजनक घटनेची गंभीर दखल घेत इंडीयन मेडिकल असोसिएशनने संपूर्ण भारतभर वैद्यकीय सेवा बंदचे आवाहन केले आहे.

या अत्यंत निंदनीय आणि संतापजनक घटनेने वैद्यकीय समुदाय आणि देशाला धक्का बसला आहे. याच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांनी आधीच संप सुरू केला आहे. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी बीड शहरात कँन्डल मार्च काढण्यात येवून या घटनेचा डॉक्टरांनी तीव्र निषेध करत न्याय देण्याची मागणी केली. यावेळी डॉक्टरांनी मेणबत्या प्रज्वलित केल्या. या मार्चमध्ये महिला-पुरुष डॉक्टर तसेच वैद्यकीय कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान कलकत्ता येथील घटनेच्या निषेधार्थ उद्या 24 तास आरोग्य सेवा बंद ठेवण्याचा निर्णय डॉक्टर असोसिएशनने घेतला आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.